रश्मी शुक्लांचं काय होणार?
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी कॉँग्रेसने केली आहे. याबाबत आयोग काय विचार करत आहे आणि काय निर्णय होईल? असा प्रश्न विचारला असता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण कायदेशीर प्रक्रियेनुसार हाताळले जाईल. कोणत्याही राज्याच्या महासंचालकांची निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. त्यानुसार यूपीएससीकडून सगळय़ात वरिष्ठ अधिकार्याचे नाव पाठविले जाते आणि त्यातून निवड केली जाते. प्रकाश सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची हाताळणी या विषयाचे नियमन करणाऱ्या कायदेशीर पद्धतीनुसार केली जाईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List