बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सलमान खानचं टेन्शन वाढणार

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सलमान खानचं टेन्शन वाढणार

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई हे चर्चेत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथक वेगवेगळ्या राज्यात गेले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. त्यातच आता मुंबई क्राईम ब्रँचने पुष्टी केली आहे की, सिद्दीकी यांची हत्या ही बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानशी जवळचा संबंध असल्याने करण्यात आली. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणानंतर बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येकडे सलमान खानच्या जवळची व्यक्ती म्हणून पाहिलं जात आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की, या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडामध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लनच्या घराबाहेर नुकतीच गोळीबार झाला, ज्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. बिश्नाई गँग एक इशारा देण्याच्या प्रयत्नात आहे. सलमान खानसोबत एका मोफत म्युझिक व्हिडिओसाठी दोघे एकत्र आले होते.

‘सलमान खान गोळीबार प्रकरण आणि आता एका राजकीय नेत्याच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगकडेच जात आहे. ही गँग सलमानच्या जवळच्या लोकांना टार्गेट करु शकते. अशी देखील चर्चा आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तातडीने बैठका घेतल्या. या हत्येने पोलीसही आश्चर्यचकित झाले. कारण ते बिश्नोई गँगकडून लक्ष्य केले जाऊ शकतात याची कल्पना पोलिसांनाही नव्हती.

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी कक्ष, विशेष शाखा आणि गुन्हेगारी गुप्तचर युनिट (CIU) यांना आता भविष्यात हल्ले रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. यासाठी सलमान खानशी संबंधित सर्व लोकांची माहिती त्यांना गोळा करावी लागेल. अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. मुंबईत कोणत्या मार्गाने शस्त्रे आली. विशेषत: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या 9 एमएम पिस्तुलसारख्या बंदुकांकडे गुन्हेगार कसे पोहोचतात. हे शोधण्याचे निर्देशही गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत.

लॉरेन्श बिश्नोई गँग आता अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. लॉरेंन्स बिश्नोई जेलमध्ये असून ही गँग चालवत आहे. ७०० हून अधिक शुटर्स या गँगमध्ये आहेत. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई हा डी कंपनी बवण्याच्या प्रयत्नात आहे की काय अशी शंका ही उपस्थित होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;