दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटं विकणाऱ्याला अटक,  लाखोंची केली कमाई 

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटं विकणाऱ्याला अटक,  लाखोंची केली कमाई 

पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची बनावट तिकिटे विकल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा कॉन्सर्ट दिलजीतच्या ‘दिल-लुमिनाटी टूर’चा एक भाग असून तो 26 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली पोलिसांनी महिनाभरापूर्वी गायकाच्या चाहत्यांना पोस्ट शेअर करुन सावधगिरीचा  इशारा दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीने 69 तिकिटांची विक्री केली होती. ज्यातून त्याने 4 लाख 76 हजार 870 रुपयांची कमाई केली होती. आरोपीने त्या पैशातून आयफोन आणि ॲपल वॉच खरेदी केले होते. आरोपीने दिल्ली पोलिसांना सांगितले की, त्याने बनावट तिकिटे विकून तिघांची फसवणूक केली आणि त्याच्याकडून 6.75 लाख रुपये घेतले. यानंतर तो बंगळुरू आणि गोव्याला गेला, तिथे त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि क्लबमध्ये पैसे खर्च केले.

दिलजीतच्या कॉन्सर्टची घोषणा होताच, सर्व तिकिटे बुक झाली आणि चाहते निराश झाले.  काही लोक ऑनलाइन तिकिटे चढ्या दराने विकत असल्याचे दिल्ली पोलिसांना आढळून आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व तिकीटे फुल झाली असून आता ब्लॅकने तिकीटविक्रीच्या नावाखाली चाहत्यांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला होता.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकीटांची विक्री करत होता आणि त्यांची किंमत 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;