भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका; भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचा: रमेश चेन्नीथला.

भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका; भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचा: रमेश चेन्नीथला.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व काँग्रेस सज्ज आहे. भाजप युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या जुमलेबाजीला फसू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी मविआलाच विजयी करा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच आहे पण महाराष्ट्रातील टोल का माफ केले नाहीत? मुंबई व महाराष्ट्राची जनता वेगळी आहे का? फडणवीस व गडकरी यांनीच ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? १० वर्षापासून भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. भाजपा युतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे पण फडणवीस सक्षम गृहमंत्री अशी जाहिरात बाजी केली जात आहे परंतु फडणवीस हे सर्वात निक्रीय गृहमंत्री आहेत.

महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज असून मविआ 288 जागांवर लढणार आहे, आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद नाही. महाराष्ट्राला वाचवणे हे आमचे लक्ष्य असून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना राज्यात कुठलेही स्थान मिळता कामा नये याची खबरदारी घेऊ. महाराष्ट्रात मोदी शाह यांचा विचार कदापी रुजू देणार नाही. महाराष्ट्रातील चित्र बदलणार असून मविआचे बहुतमाचे सरकार येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

राज्यपालांनी आज घाईघाईत 7 जणांना राज्यपाल नियुक्त आमदारपदाची शपथ दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना 12 जणांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राजभवला दिली होती पण त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर सही केली नाही. हे प्रकरण न्यायालयात असून त्याचा निकाल अजून लागलेला नसताना राज्यापालांनी 7 जणांची नियुक्ती केली आहे, याप्रकरणी कोर्टात दाद मागू असे पटोले यांनी सांगितले.

हिरामण खोसरकारांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इगतपूरी हा काँग्रेस विचाराचा मतदारसंघ असून ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केली होती, लोकसभा निवडणूक व त्यानंतरही त्यांनी सतत पक्षविरोधी कारयावा केल्यामुळे त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. इगतपुरीत काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे, स्थानिक उमेदवारालाच संधी दिली जाईल असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;