ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेत्री म्हणाली, मला कधीच…

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेत्री म्हणाली, मला कधीच…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या अनेक वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होता. अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती. मात्र, एका वाईट वळणावर त्यांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय.

सतत घटस्फोटाच्या चर्चा असताना त्यावर अजिबात भाष्य करताना बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच दिसत नाहीये. ऐश्वर्या राय ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. एकेकाळी रानी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या खूप जास्त छान मैत्रिणी होत्या. मात्र, यांची मैत्री फार काळ टीकू शकली नाही.

 ‘चलते चलते’ चित्रपटामुळे दोघींमध्ये वाद झाला. चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे संबंध चांगले नव्हते. सलमान खान याने चित्रपटाच्या सेटवर येत मोठा हंगामा केला. यानंतर शाहरुख खान जो चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होता. त्याने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

ऐश्वर्या ऐवजी त्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला घेण्यात आले. हीच गोष्टी ऐश्वर्याला अजिबात आवडली नाही. आपल्या खास मैत्रिणीने असे केल्याने ऐश्वर्या राय ही खूप जास्त नाराज झाली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने राणी मुखर्जीला बोलणे देखील बंद केले. याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीमध्ये करताना राणी मुखर्जी दिसली.

राणी मुखर्जी ही करण जोहरच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसली. राणी मुखर्जी म्हणाली की, तुम्हाला ही कारण माहिती आहे. मला कोणाशीही काही प्रॉब्लेम नाही आणि मला अजूनही ती (ऐश्वर्या राय) आवडते. मला ऐश्वर्या राय हिच्यासोबत वैयक्तिक काहीच समस्या नाहीये. 

मला वाटते की, ऐश्वर्याला माझ्याशी काहीतरी समस्या आहे. कारण तिने मला फोनवर बोलणे देखील बंद केले. आम्ही त्यानंतर कुठेही एकत्र भेटलो नसल्याचेही सांगताना राणी मुखर्जी ही दिसली. मात्र, राणी मुखर्जी हिच्यासोबत असलेल्या वादावर कधीच ऐश्वर्या राय हिने भाष्य हे केले नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;