सनी देओलची पत्नी कधीच कॅमेरासमोर का येत नाही? अभिनेत्याकडून खुलासा

सनी देओलची पत्नी कधीच कॅमेरासमोर का येत नाही? अभिनेत्याकडून खुलासा

अभिनेते सनी देओलसारख्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीशी लग्न करूनही त्याची पत्नी पूजा देओल नेहमीच लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करते. सनी देओलसुद्धा त्याच्या पत्नीविषयी मुलाखतींमध्ये फारसा व्यक्त होत नाही. गेल्या वर्षी मुलगा करणच्या लग्नात पहिल्यांदा चाहत्यांना पूजा देओलची झलक पहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा पूजा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे करणने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो. आईसोबतचा खास फोटो पोस्ट करत करणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आईसोबत घालवलेला वेळ हा सर्वोत्तम वेळ असतो’, असं करणने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या फोटोवर सनी देओलनेही हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

सनी देओलचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीसुद्धा त्यांची पत्नी प्रकाश कौर यांना कॅमेरापासून दूरच ठेवलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने यामागचं कारण सांगितलं होतं. कॅमेरापासून दूर राहणं, प्रकाशझोतात न येणं हा आई प्रकाश कौर आणि पत्नी पूजा देओल यांचा व्यक्तीगत निर्णय होता, असं त्याने म्हटलं होतं. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, “माझी आई किंवा माझ्या पत्नीला कधीच लाइमलाइटपासून दूर राहण्याची बळजबरी केली नव्हती. माझ्या पत्नीचं स्वत:तं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. आपले निर्णय स्वत:च घेण्याचं स्वातंत्र्य तिला नेहमीच आहे. लोकांसमोर, कॅमेरासमोर न येणं हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. जसं मी याआधीही म्हटलं होतं की माझ्या वडिलांनी कुटुंबातील महिलांना कधीच आमचे नियम पाळण्याची सक्ती केली नव्हती. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

सनी आणि पूजा हे गेल्या 40 वर्षांपासून विवाहबद्ध आहेत. ‘बेताब’ हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरातच 1984 मध्ये सनीने पूजाशी लग्न केलं होतं. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एका मॅगझिनमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो लीक झाले तेव्हा सर्वांना त्याविषयी समजलं होतं. करण देओलने त्याच्या लग्नानंतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रकाश कौर आणि इतर कुटुंबीय दिसून आले होते.

सनी देओलने ब्रिटिश शाही कुटुंबातील लिंडाशी केलंय. लिंडाने सनी देओलशी लग्न केल्यानंतर आपलं नाव बदलून पूजा असं ठेवलंय. आज ती पूजा देओल म्हणूनच ओळखली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;