Maharashtra Election 2024 – विधानसभा निवडणुकीची घोषणा; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकर परिषद घेत तारखांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करता महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. यापैकी 4 कोटी 97 लाख पुरुष तर 4 कोटी 66 लाख महिला मतदार आहेत. यात 1.85 कोटी तरुण मतदार आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. तसेच निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List