Maharashtra election 2024 Live – महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

Maharashtra election 2024 Live – महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल


दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची तारखा जाहीर करत आहेत. महाराष्ट्रामध्ये 288, तर झारखंडमध्ये 81 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

वाचा सर्व लाईव्ह अपडेट…

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, अर्ज छाननीची तारीख – 30 ऑक्टोबर, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर
  • 288 विधानसभा मतदारसंघासाठी 20 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार
  • महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
  • गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रामध्ये तीन वेळा माहिती द्यावी लागणार.
  • मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांना घरून मतदान करण्याची सुविधा
  • ज्य़ेष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार
  • झारखंडमध्ये 29 हजार 562 मतदान केंद्र आहेत.
  • 66.84 लाख तरुण मतदार असून 11.84 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
  • झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या 2.6 कोटी असून यातील 1.29 कोटी महिला आणि 1.31 कोटी पुरुष आहेत.
  • झारखंडमध्ये 24 जिल्हे असून 81 मतदारसंघ आहेत. यापैकी 44 जनरल, 28 एसटी आणि 9 एससीसाठी राखीव आहेत.
  • महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र आहेत.
  • तरुण मतदारांची संख्या 1.85 कोटी आहे, यातील 23.93 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
  • महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत. यातील 4.97 कोटी पुरुष, 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
  • महाराष्ट्रात 36 जिल्हे असून 288 मतदारसंघ आहेत. यातील 234 मतदारसंघ जनरल, तर 25 मतदारसंघ स्केड्यूल कास्ट आणि 29 एससीसाठी आहेत.
  • हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. एकही लाठी चालली नाही, एकही गोळी चालली नाही.
  • हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमधील सर्व मतदारांचे आभार
  • निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;