नोकरदार महिला अन् मोलकरीण बाईची कथा सांगणारा ‘नाच गं घुमा’ आता टीव्हीवर
'वेड', 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा', 'पावनखिंड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘नाच गं घुमा’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे.
नोकरदार महिला आणि तिच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणारी मोलकरीण बाई यांच्या नात्याची गंमतीशीर गोष्ट ‘नाच गं घुमा’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
फक्त महिलावर्गच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आपलीशी वाटेल. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट प्रत्येकानेच पाहायला हवा, असा आहे.
'नाच गं घुमा'च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, "स्टार प्रवाह वाहिनी नेहमी दर्जेदार आशय रसिकांना देत असते. नाच गं घुमा अशीच एक धमाल पण रोजच्या जीवनातील संबंधित चित्रपट आहे, जो आशय आणि करमणुकीची सुंदर सांगड घालून देतो. घरातल्या प्रत्येकासाठी हा चित्रपट करमणुकीची मेजवानी असेल."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List