तू है तो दिल धडकता है…, दुसऱ्या लग्नाची चर्चा, दुबईत कोणासोबत दिसली सानिया मिर्झा?

तू है तो दिल धडकता है…, दुसऱ्या लग्नाची चर्चा,  दुबईत कोणासोबत दिसली सानिया मिर्झा?

Sania Mirza: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शोएब याच्यासोबत खुला केल्यानंतर सानिया हिने देखील दुसरं लग्न केलं… अशा चर्चांना उधाण आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सानिाय हिने शोएब मलिक याची तिसरी पत्नी सना जावेद हिच्या पहिल्या नवऱ्यासोबत लग्न केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सना जावेद हिच्या पहिल्या पतीचं नाव उमैर जसवाल असं आहे.

सना जावेद हिने शोएब याच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. त्याच प्रमाणे शोएब याचं देखील सना हिच्यासोबत तिसरं लग्न आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दरम्यान, सानिया मिर्झा हिच्या देखील दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सानिया हिचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुबईतील आहे. सानिया कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता अभिनेत्री दुबईतील एका मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सानिया बहीण आणि मुलांसोबत फिरताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa)

 

बहीण अनम मिर्जा आणि मुलगा इजहान यांचं हात पकडून सानिया मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. व्हिडीओसाठी सानिया हिने ‘तू है तो’ हे गाणं लावलं आहे. व्हिडीओमध्ये अनम मिर्झा हिची मुलगी देखील दिसत आहे. घटस्फोटानंतर सानिया बहीण आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सानिया तिच्या कुटुंबियांसोबत दुबईत राहते.

सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर शोएब याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण सानिया मात्र दुबईतच राहिला. घटस्फोटानंतर सानियाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील सानियाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सानिया हिच्या दुसऱ्या लग्नाचं सत्य

सानिया मिर्झा हिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहे. सानिया हिने दुसरं लग्न केलेलं नाही. यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. लग्नाच्या 10 वर्षानंतर शोएब आणि सानिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;