कास-बामणोली दुर्गम भागातील प्रवाशांच्या जीवाला धोका; एसटीची दोन चाके निखळली

कास-बामणोली दुर्गम भागातील प्रवाशांच्या जीवाला धोका; एसटीची दोन चाके निखळली

कास-बामणोली या दुर्गम भागातील एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला असून, एसटीने प्रवास करावा की नको, असा प्रश्न आता या दुर्गम भागातील प्रवाशांना पडला आहे. जावली तालुक्यातील सावरी गावाच्या हद्दीमध्ये गोगवे-सातारा बसची दोन चाके निखळून गेली. त्यामुळे भीषण अपघात होता होता वाचला. दैव बलवत्तर म्हणूनच एसटीतील प्रवासी सुखरूप राहिले.

सातारा एसटी आगारातून पहाटे सुटणारी सातारा-कास-बामणोली-तेटली-गोगवे या एसटी बसला गोगवे येथून परत साताराकडे येत असताना सावरी गावामध्ये अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, एसटी बसची पाठीमागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून पडली. एक चाक निखळल्यानंतर प्रसंगावधान राखत चालकाने तशीच एसटी पुढे काही अंतरावर आणली होती. त्यावेळी दुसरे चाकदेखील फाटून पूर्णपणे काळेश्वरी मंदिरानजीक आल्यानंतर निखळून पडले.

हा संपूर्ण भाग डोंगराळ व वळणा वळणाचा घाटमाथ्याचा असल्याने या भागात सुस्थितीत चांगल्या एसटी बस पाठवण्यात याव्यात, अशी वारंवार मागणी होऊनदेखील या भागामध्ये नादुरुस्त भंगार झालेल्या बस पाठवल्या जात आहेत.

दीड महिन्यातील ही दुसरी दुर्घटना
दीड महिना कालावधीमध्ये याच परिसरामध्ये एसटी अपघाताची ही दुसरी घटना असल्याने एसटी बसने प्रवास करावा की नको, अशी धास्ती आता या भागातील विद्यार्थी व प्रवासी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन अपघातांनंतर तरी सातारा आगारप्रमुखांचे डोळे उघडणार का, याकडे या दुर्गम भागातील प्रवासी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;