येणारा काळ माझ्यासाठी…, असं म्हणणाऱ्या अतुल परचुरेंनी कसा केला आजाराचा सामना?

येणारा काळ माझ्यासाठी…, असं म्हणणाऱ्या अतुल परचुरेंनी कसा केला आजाराचा सामना?

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… असंच काही ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्यासोबत झालं आहे. कर्करोगावर खंबीरपणे मात केल्यानंतर नव्याने आयुष्य सुरु केलेल्या परचुरे यांच्या निधनामुळे चाहते आणि जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. आता परचुरे पुन्हा आपलं मनोरंजन करणार नाहीत… याच विचाराने चाहते विचलित झाले आहे. अनेक सिनेमे, मालिकांमध्ये आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवणारे अतुल परचुरे रडवून पुढच्या प्रवासाला गेले आहे.

अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात करुन नव्या इनिंगला सुरुवात केली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारना होत नव्हती. अशात सोमवारी संध्याकाळी अचानक अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला.

सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत अतुल परचुरे यांनी आजाराच्या काळातील अनुभव सांगितले होते. आज अतुल परचुरे आपल्यात नसले त्यांनी त्यांचं कार्य आणि त्यांच्यामधील सकारात्मकता फार काही शिकवून जाते. आयुष्यातील कठीण काळाबद्दल अतुल परचुरे म्हणाले, ‘आता मला कसलं सरप्राईज वाटणार नाही किंवा मला कसला ट्रॉमा येणार नाही.’

पुढे परचुरे म्हणाले, ‘पुढे काहीही झालं तरी माझ्या मनाची तयारी आहे. मला पुढे काहीही होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. शेवटी जे काही व्हायचं ते होईल. यापुढे मला सर्वकाही चांगलं दिसत आहे. मी आता आयुष्याकडे नव्याने पाहात आहे. आता मी मला वाटेल तेवढंच काम करणार.’

‘येणारा काळ माझ्यासाठी चांगलाच असणार आहे…’ असं देखील अतुल परचुरे म्हणाले होते. पण त्यांच्या नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. कर्करोगावर मात केल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण अचानक अतुल परचुरे यांच्या जीवनाचा प्रवास अचानक थांबला आणि एका विनोदवीराचा अंत झाला.

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;