अतुल परचुरे यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?

अतुल परचुरे यांच्या निधनामागचं नेमकं कारण काय?

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करून ते पुन्हा रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

निधनाचं कारण काय?

नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर अभिनेता म्हणून घोडदौड सुरू असतानाच परचुरे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. सुरुवातीला झालेले चुकीचे उपचार, त्यानंतर कर्करोगावरचे उपचार अशी कडवी झुंज देत ते आजारातून बरे झाले होते. अत्यंत जिद्दीने कर्करोगावर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं होतं. त्यांची भूमिका असलेला ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ते ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची जय्यत तयारी सुरू होती. या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटाच्या विकाराचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. याही आजारपणातून बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील अशी आशा त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मित्रपरिवाराला होती. मात्र या आजारावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अतुल परचुरे यांनी बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका करत व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;