Baba Siddiqui Murder : सलमान खान फक्त नावाला, बिश्नोई गँगचा खरा गेम आहे दुसराच

Baba Siddiqui Murder : सलमान खान फक्त नावाला, बिश्नोई गँगचा खरा गेम आहे दुसराच

Baba Siddique Death : माया नगरी मुंबई आणि बॉलिवूडवर 1990 च्या दशकापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मुंबईत टोळी युद्ध भडकलं होतं. आता एनसीपी नेते आणि रियल एस्टेटमधील मोठे व्यावसायिक बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर परिस्थिती बदलली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये सुद्धा कंफ्यूजन आहे. उत्तर भारतात दबदबा निर्माण करणारा लॉरेंस बिश्नोई आता बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करुन त्याने बॉलिवूडचा तसा संदेश सुद्धा दिला आहे. डी कंपनीची दादागिरी चालणार नाही, हे त्याने साफ संकेत दिलेत.

दाऊद इब्राहिम आता भाई राहिलेला नाही, हे लॉरेन्सने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत रियल एस्टेट आणि बॉलिवूडवर एकछत्र अमल ठेवण्यासाठी 90 च्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन, हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार आणि अरुण गवळी अशा अनेक गँग्स तयार झाल्या. त्यावेळी मुंबईत भरपूर गँगवॉर झालं. रस्त्यावर खुलेआम गोळीबाराच्या घटना घडल्या. अखेर डी कंपनी सर्वांवर भारी पडली.

डी गँगची पकड कमजोर

बॉलीवूड ते रियल एस्टेटपर्यंत इच्छा नसतानाही डी कंपनीला हफ्ता द्यावा लागला. मुंबईतल्या गँग्समध्ये आजपर्यंत डी कंपनी सर्वात मोठी मानली जात होती. अनेक फिल्म्सचे स्क्रिप्ट, गाणी, अगदी हिरो-हिरॉईन दाऊदच्या इशाऱ्यावरुन बदलण्यात आले. वेळेबरोबर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळल्या. दाऊद आज देशाबाहेर आहे. त्यामुळे डी कंपनीची मुंबई आणि बॉलिवूडवरची पकड आता कमजोर झाली आहे. अशा स्थितीत आता बिश्नोई गँग आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतेय.

‘तुमचे दिवस आता संपले’

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्या शब्दाला भरपूर किंमत आहे. हे तिघेही बाबा सिद्दीकीच्या कार्यक्रमात दिसायचे. आता गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने बाबा सिद्दीकीची हत्या करुन या तिन्ही अभिनेत्यांना खासकरुन सलमान खानाला संदेश दिला आहे. त्याचबरोबर तुमचे दिवस आता संपले, हा डी कंपनीला सुद्धा संदेश दिला आहे. सलमानच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा डाव आहे.

आता फुलप्रूफ योजनेवर काम

लॉरेंस बिश्नोईची गुन्हेगारीची कारकीर्द 15 वर्षांपूर्वी सुरु झाली. मूळचा पंजाबचा असलेल्या लॉरेंसने संपत नेहरासोबत चंदीगडमध्ये गुन्हेगारीची सुरुवात केली. आधी हरियाणा, पंजाब आणि त्यानंतर दिल्लीत धाक निर्माण केला. त्यानंतर जगातील सात देशात नेटवर्क तयार केलं. सलमान खानला धमकी देण्यापासून त्यांनी सुरुवात केली. आता बॉलिवूडवर वर्चस्व मिळवण्याच्या फुलप्रूफ योजनेवर त्यांनी काम सुरु केलय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;