जालन्यात नऊ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

जालन्यात नऊ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

जालना शहरातील चंदनझिरा येथील मातोश्रीनगर भागात एक 9 वर्षीय मुलगी रविवारी रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. या मुलीला नातेवाईकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांच्या मदतीने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हलविले. सदर मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिला बेदम मारहाण करण्यात आल्याने ती बेशुद्ध पडली होती.  स

दर मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असून, तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सध्या ते चंदनझिरा पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जोरदार निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरीकांच्या वतीने पोलीस प्रशासना विरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;