लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पुढच्या टार्गेटवर सलमान खानसह आणखी चारजण, नावेही सांगितली

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पुढच्या टार्गेटवर सलमान खानसह आणखी चारजण, नावेही सांगितली

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्रे इथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हत्येचे कारण सांगितले. दरम्यान, NIA ने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोईने रडारवर असणाऱ्या 5 व्यक्तींची नावे सांगितली आहेत.यामध्ये पहिल्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान याचा समावेश आहे.

शनिवारी रात्री आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे-खेरनगर येथील कार्यालयातून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या तिघांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र बिश्नोई टोळीचा म्होरक्या सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. असे असले तरी त्याचे चेले त्याच्या इशाऱ्यावर गुन्हा करत आहेत. अशातच NIA ने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असता त्याचं पुढचं टार्गेट अभिनेता सलमान खान असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अन्य चार जणांची नावे सुद्धा त्याने सांगितली आहेत.

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलामान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचा मॅनेजर सगुनप्रीत सिंग याचे नाव आहे. बिश्नोई गँगशी जवळचे संबंध असणाऱ्या विक्की मिद्धुखेडा याची 2021 साली हत्या करण्यात आली होती. मिद्धुखेडाची हत्या करणाऱ्यांना सगुनप्रीत सिंगने आश्रय दिला होता. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर गँगस्टर मंदीप धालीवाल, चौथ्या क्रमांकावर गँगस्टर कौशल चौधरी आणि पाचव्या क्रमांकावर बंबीहा टोळीचा म्होरक्या अमित डागर याचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;