ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ…, असं का म्हणाले अमिताभ बच्चन?

ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ…,  असं का म्हणाले अमिताभ बच्चन?

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या तिच्या सासरच्या मंडळींसोबत ‘जलसा’ बंगल्यात राहत नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे ऐश्वर्या मुगली आराध्या हिच्यासोबत वेगळी राहते अशा चर्चा देखील सर्वत्र रंगल्या. पण ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही. दरम्यान, बच्चन कुटुंबासाठी ऐश्वर्या राय अशुभ आहे… अशा चर्चा देखील एकेकाळी रंगल्या होत्या. ज्यावर खद्द बिग बींनी मोठं वक्तव्य केलं होतं.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या – अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केलं. तेव्हा ऐश्वर्या – अभिषेक यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासाठी अशुभ आहे. तिला मंगळ आहे… त्यामुळे अभिनेत्रीचं पहिलं लग्न एका झाडासोबत झालं, त्यानंतर अभिषेकसोबत अशा देखील अनेक चर्चा रंगल्या.

रंगणाऱ्या चर्चांवर मौन सोडत अमिताभ बच्चन यांनी रंगणाऱ्या सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं. ‘कोणी कोणासाठी शुभ-अशुभ नसतं. जे नशिबात लिहिलं आहे तेच होणार… यासर्व चर्चांना ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यावर वाईट परिणाम होत आहे. लग्न दोघांचं असतं. ते पती-पत्नी आहेत आणि कायम राहातील.’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच, अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या प्रेक्षकांना एक व्हिडीओ दाखवण्यात आला.

व्हिडीओमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, अभिषेक बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा आणि आराध्या बच्चन देखील होती. पण व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय नव्हती. ज्यामुळे, पुन्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;