हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबत युट्यूबरचा रोमान्स; ट्रोल होताच म्हणाला..

हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबत युट्यूबरचा रोमान्स; ट्रोल होताच म्हणाला..

‘बिग बॉस ओटीटी’ विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला नुकतंच क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी नताशा स्टँकोविकसोबत पाहिलं गेलं होतं. या दोघांनी सोबत एक व्हिडीओ शूट केला होता. नताशा आणि एल्विशला एकत्र पाहून नेटकरी चकीत झाले होते. या व्हिडीओमधील दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी एल्विशला ट्रोल केलंय. या ट्रोलिंगवर आता एल्विशने प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टँकोविक यांनी यावर्षी जुलै महिन्यात घटस्फोट जाहीर केला. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे.

एल्विशने एका ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये एल्विशच्या बाजूने बोललं जात होतं. युजरने लिहिलं होतं, ‘नताशा-एल्विश एका म्युझिक व्हिडीओच्या प्रोमो शूटमध्ये एकत्र दिसले. मात्र चाहत्यांनी दोघांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमध्ये कोणतंच तथ्य, नैतिकता किंवा प्रामाणिकपणा नसतो, हे यावरून स्पष्ट होतंय.’ या ट्विटवर एल्विशने प्रतिक्रिया देत म्हटलंय, ‘..आणि मोफत इतकं पीआरसुद्धा (प्रसिद्धी) करून देतात.’ या कमेंटच्या पुढे एल्विशने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. ट्रोलिंग करून नेटकरी आणखी प्रसिद्धी देत असल्याचं त्याने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

एल्विश आणि नताशाने ‘तेरे करके’ या पंजाबी गाण्यासाठी एक रील शूट केलं होतं. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळत आहे. हे दोघं एखाद्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एल्विशचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री किंवा सेलिब्रिटीसोबत मिळून व्हिडीओ शूट करत असतो.

हार्दिक आणि नताशाने जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने 2020 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;