पूर्व पत्नी सुझानसोबत हृतिक रोशनचा ‘डे आऊट’; मुलाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

पूर्व पत्नी सुझानसोबत हृतिक रोशनचा ‘डे आऊट’; मुलाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अभिनेता हृतिक रोशन नुकताच इटलीहून भारतात परतला आहे. आगामी ‘वॉर 2’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो इटलीला गेला होता. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातूनही हृतिक त्याच्या कुटुंबीयांसाठी आवर्जून वेळ काढताना दिसून येतो. नुकतंच त्याला पूर्व पत्नी सुझान खानसोबत मुंबईत पाहिलं गेलं. यावेळी दोघांसोबत त्यांचा मुलगासुद्धा होता. पूर्व पत्नी आणि मुलासोबत हृतिकने एकत्र वेळ घालवला. या तिघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक आणि सुझानपेक्षाही त्यांच्या मुलाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी हृतिक त्याच्या पूर्व पत्नी आणि मुलासोबत बाहेर गेला होता. यावेळी तिघंही कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले होते. या व्हिडीओत आधी हृतिक समोरून चालत येताना दिसत आहे, तर सुझान आणि तिचा मुलगा मागे एकत्र येत आहेत. यानंतर आधी हृतिक आणि त्याचा मुलगा एका कारमध्ये बसतात, तेव्हा सुझान त्यांना निरोप देते आणि तिथून तिच्या कारच्या दिशेने पुढे चालत जाते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे दोघं घटस्फोटानंतर एकमेकांसोबत अधिक वेळ घालवताना दिसतायत’, असं एकाने लिहिलं. तर ‘एकत्रच वेळ घालवायचं होतं तर घटस्फोट का दिला’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. तर अनेकांनी हृतिकच्या मुलाबाबतही कमेंट्स केल्या आहेत. ‘हृतिकचा मुलगा हा हृतिकसारखाच हँडसम आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हृतिक आणि सुझान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. 2014 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले होते. सुझान ही अभिनेते फिरोज खान यांची मुलगी आणि अभिनेता झायेद खानची बहीण आहे. घटस्फोटानंतर सुझान आणि हृतिक दोघं मिळून त्यांच्या दोन्ही मुलांचं संगोपन करत आहेत. त्यामुळे अनेकदा या दोघांना मुलांसाठी एकत्र आल्याचं पहायला मिळालं. इतकंच नव्हे तर हृतिक आणि सुझान आपापल्या वैयक्तिक आयुष्यातही पुढे निघून गेले आहेत. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला तर सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. या चौघांमध्येही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. या चौघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात. किंबहुना सबा आणि सुझान यांच्यातही खूप चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;