हडपसरमध्ये खोक्यात आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

हडपसरमध्ये खोक्यात आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

तरुणाचा खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले. मृतदेह शुक्रवारी सायंकाळी हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ कागदी खोक्यात सापडला होता. तरुणाचे हात-पाय बांधून खोक्याला चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले.

निजामुद्दीन पटेल (वय 30, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. इम्रान यासीन पटेल (वय 24, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. आसिफ मेहबुब पटेल (वय 29, रा. रॉयल मॅरेज हॉलसमोर, थेऊर फाटा, गाढवे मळा, लोणी काळभोर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. खोके उघडल्याानंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे हात-पाय बांधण्यात आले होते. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती घेण्यात आली. कोंढवा परिसरातून इम्रान पटेल बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पटेलच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली. इम्रानच्या खुनापूर्वी आदल्या दिवशी सायंकाळी निजामुद्दीनने त्याला बोलावून घेतले होते. आर्थिक वादातून निजामुद्दीनने इम्रानच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. या घटनेत इम्रानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निजामुद्दीनने त्याचे हात-पाय दोरीने बांधून खोक्यात मृतदेह ठेवला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांना सांगितले. हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके टाकून तो पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, समीर पांडुळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ यांनी ही कामगिरी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;