आधी केस गेले आता पापण्याही गळून पडल्या; कॅन्सरशी झुंजणाऱ्या अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

आधी केस गेले आता पापण्याही गळून पडल्या; कॅन्सरशी झुंजणाऱ्या अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या तब्येतीमुळे त्रस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच तिला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हिनावर केमोथेरपी सुरू असून तिने तिचे संपूर्ण केसही कापलेले होते. कॅन्सरमुळे तिचे केस गळू लागले होते मात्र आता हळू हळू तिच्या पापण्याही गळून पडल्या आहेत. याबाबत तिने स्वत: एक फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री हिना जीवघेण्या आजाराशी झुंज देत असली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. हिनी तिच्या चाहत्यांना नेहमी तिच्या तब्येतीबाबत कल्पना देत असते. आता नुकताच तिने तिच्या डोळ्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्हाला जाणून घ्यायचा का या कठीण काळात मला प्रेरणा देणारे स्त्रोत काय? असा प्रश्न तिने कॅपशनमध्ये विचारला आहे. एकेकाळी माझ्या डोळ्यांना शोभणाऱ्या सुंदर झूपकेदार पापण्या होत्या. आता मात्र माझ्या शेवटच्या उरलेला पापण्यांचा हा केस एकटा आणि धाडसी लढवय्या आहे. केमोनंतर या आजाराशी लढण्याची माझी एकमेव प्रेरणा म्हणजे पापण्याचा राहिलेला हा एकमेव केस आहे. कोई ना सब ठीक हो जाना है. माझ्यासाठी प्रार्थना करा असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@realhinakhan)

अभिनेत्रीच्या या पोस्टवरून चाहत्य़ांनी तिला धीर दिला आहे. तसेच तिच्या धाडसाला लोकांनी सलाम केला आहे. तुम्ही काळजी करू नका! आम्ही तुमच्या सोबत आहोत. देव तु्म्हाला शक्ती देवो… अश्या कमेंट चाहत्यांनी हिनाच्या या पोस्टवर केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;