बोपदेव घाट अत्याचार प्रकरण, तपास गुन्हे शाखेकडे; आरोपींकडून यापूर्वीही परिसरात लुटीचे अनेक गुन्हे

बोपदेव घाट अत्याचार प्रकरण, तपास गुन्हे शाखेकडे; आरोपींकडून यापूर्वीही परिसरात लुटीचे अनेक गुन्हे

मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबरला ही घटना घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास 60 पथकांकडून करण्यात येत आहे. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी कनोजिया आणि त्याचे साथीदार लूटमारीचे गुन्हे करण्यासाठी ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. घाटात एकेठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी एकातांत बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एकेठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले.

आरोपींनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर करीत सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले. आरोपींनी त्या भागात यापूर्वी लूटमारीचे गुन्हे केल्याने त्यांना तेथील माहिती होती. सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्या भागात आहेत, याचीही त्यांना माहिती होती. सासवड येथील आमराई वस्ती परिसरातील पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात संशयित आरोपी आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी चित्रीकरण तपासले, तेव्हा मद्य विक्री दुकानात पाचजण मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक जण सराईत होता. पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने या प्रकरणातील तीन आरोपींची माहिती दिली. तांत्रिक तपासात आरोपीचा वावर बोपदेव घाटात असल्याचे आढळून आले. तांत्रिक तपास, खबऱ्याची माहिती आणि रेखाचित्र तंतोतंत जुळल्याने एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;