योग, मुलांसाठी खेळणी, ऍम्पी थिएटर, ज्येष्ठांसाठी गजेबो; शिवसेनेच्या वतीने दिंडोशीवासियांना उद्यानाची भेट

योग, मुलांसाठी खेळणी, ऍम्पी थिएटर, ज्येष्ठांसाठी गजेबो; शिवसेनेच्या वतीने दिंडोशीवासियांना उद्यानाची भेट

लहानांपासून मोठ्यांचे आरोग्य, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गजेबो, हिरवळ, विविध प्रकारची झाडे, खेळणी, जॉगिंग ट्रक, खुले समाज मंदिर अशा सर्वसमावेशक मृणालताई गोरे स्मृती उद्यानाची भेट शिवसेनेने दिंडोशीवासियांना आज दिली. खडक फोडून आणि टेबल स्पॉट उभारून बांधण्यात आलेले हे निसर्गरम्य उद्यान शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी आज रहिवाशांसाठी खुले केले. सुमारे 3 हजार चौरस मीटर जागेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून सुनील प्रभू यांनी नूतनीकरण करून या उद्यानाचा विकास केला तर माजी उपमहापौर सुहास वाडकर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 40 मधील नव्याने बांधण्यात आलेल्या ‘ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे स्मृती उद्यान’ आज नागरिकांसाठी खुले झाले. पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांनी संघर्षं व अनेक आंदोलने करून येथे मध्यमवर्गीयांना निवारा मिळण्यासाठी सुमारे 62 एकर जागेत नागरी निवारा वसाहत उभी केली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून या ठिकाणी सुसज्ज उद्यान त्यांच्या नावाने उभारावे, अशी मागणी येथील 113 गृहनिर्माण सोसायट्यांनी आमदार सुनील प्रभू यांच्याकडे केली होती. या उद्यानाचा विकास लवकरात लवकर करून नागरिकांना खुले करून देण्याची ग्वाही आमदार सुनील प्रभू यांनी स्थानिकांना दिली होती. तसेच मागील अनेक महिने काम पूर्ण करून घेण्यासाठी माजी उपमहापौर सुहास वाडकर यांनीदेखील पाठपुरावा केला.

यावेळी नागरी निवारा फेडरेशनचे पदाधिकारी मुकुंद सावंत, संग्राम राणे, शैलेश पेंडामकर, चंद्रकांत माने, नागरी निवाराचे विश्वस्त विनायक जोशी, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख भाई परब, समन्वयक प्रशांत घोलप, विनिता विचारे, विधानसभा समन्वयक आशा केणी, शाखाप्रमुख संदीप जाधव, शाखाप्रमुख संपत मोरे, पद्मा राऊळ, शिवसेना शाखा क्र. 40 च्या सर्व महिला, पुरुष उपशाखाप्रमुख, उपशाखा संघटक, गटप्रमुख, गटसंघटक, शिवसैनिक, स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहेत सुविधा

योगाची सुविधा, लहान मुलांसाठी विविध खेळणी, फिटनेस फ्रिक तरुणांसाठी ओपन एअर जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी गजेबो (ज्येष्ठ नागरिक कट्टा), बैठक व्यवस्था (गार्डन बेंच), हिरवळ (लॉन), विविध प्रकारची झाडे, चिमुरड्यासाठी विविध खेळणी, भव्य प्रवेशद्वार, जॉगिंग ट्रक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले अॅम्पी थिएटर, खुले समाज मंदिर अशा साधनांनी युक्त असे हे सुंदर रंगरंगोटी केलेले उद्यान येथील नागरिकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;