Baba Siddqiue Murder – बाबा सिद्दीकींना Y सुरक्षा नव्हतीच, तीन कॉन्सेटबलची सुरक्षा असताना घटनेच्या वेळी एकच कर्मचारी होता उपस्थित

Baba Siddqiue Murder – बाबा सिद्दीकींना Y सुरक्षा नव्हतीच, तीन कॉन्सेटबलची सुरक्षा असताना घटनेच्या वेळी एकच कर्मचारी होता उपस्थित

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आज पत्रकार परिषद घेतली. बाबा सिद्दीकी यांना व्हाय दर्जाची सुरक्षा नव्हतीच. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन कॉन्स्टेबल तैनात होते. पण जेव्हा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एकच पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नलावडे म्हणाले की घटनास्थळी तीन आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. यातील तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. सर्व आरोपींची ओळख पटली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

 

तिसऱ्या आरोपीच शोध घेण्यासाठी 15 पोलीस पथकं स्थापन केली असून त्यांना वेगवेगळ्या राज्यात पाठवले आहे. बाबा सिद्दीकी यांची 9 ते साडे नऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांना व्हाय सिक्युरिटी नव्हती. पण त्यांच्या सुरक्षेसाठी तीन कॉन्सेबल देण्यात आले होते. तसेच जेव्हा घटना घडली तेव्हा एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होता.

या आरोपींचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध होता का, हे आरोपी अल्पवयीन आहेत का, एसआरए प्रकरणी ही हत्या झाली आहे का या सर्व अंगाने पोलीस चौकशी करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;