जयपूरच्या रस्त्यावर धावताना दिसली बर्निंग कार; थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

जयपूरच्या रस्त्यावर धावताना दिसली बर्निंग कार; थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

राजस्थानच्या जयपूर शहरातील अजमेर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. इथल्या एलिव्हेटेड रोडवर धावणाऱ्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे तेथील उपस्थित लोकांमध्ये आणि इतर वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या जळत्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र जांगीड असे या कारचालकाचे नाव आहे. जितेंद्र एलिव्हेटेड रोडवरून खाली येत होता. यावेळी त्याला कारच्या एअर कंडिशनिंग युनिटमधून धूर येताना दिसला. त्यामुळे तो घाबरला आणि लगेचच कारमधून उतरला. यावेळी त्याने बोनेट उघडून कारची तपासणी केली. बोनेट उचलताना जितेंद्रला इंजिनला आग लागल्याचे दिसले.


दरम्यान कारचालकाने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच आग वाढल्यामुळे कारचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली. यावेळी  धटनास्थळी उपस्थित असलेले इतर वाहनचालक आणि लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. गाडी रोडवरून खाली उतरत असताना मोटारसायकलस्वारालाही धडक दिली. दरम्यान जळत्या कारचा हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;