बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या जीवाला धोका? पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
Baba Siddique Death: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. रविवापी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पोलीस आता सतर्क झाले आहेत. पोलीस सलमान खानच्या घराबाहेर कोणालाही थांबू देत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List