गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस 18’च्या घरात दाखल, अजित पवार यांनी बोलणे टाळले, अखेर…

गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस 18’च्या घरात दाखल, अजित पवार यांनी बोलणे टाळले, अखेर…

बिग बॉस मराठी सीजन 5 संपले असून बिग बॉस 18 ला सुरूवात झालीये. सलमान खान हा बिग बॉस हिंदीला होस्ट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली की, सलमान खान हा त्याच्या हेल्थमुळे यंदाचे बिग बॉस हिंदीचे सीजन होस्ट करणार नाहीये. मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, सलमान हाच होस्ट करताना दिसेल. आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसेल. अनेक लोक बिग बॉस फक्त आणि फक्त सलमान खान याच्यासाठीच बघतात. विशेष म्हणजे यंदाच्या बिग बॉसबद्दल लोकांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील बिग बॉस 18 मध्ये दाखल झाले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरत चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. यासोबतच त्याला आपण घर बांधून देणार असल्याचेही अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. बिग बॉसचा विजेता सूरज झाल्यापासून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.

अजित पवार यांना गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस 18 मध्ये दाखल झाले, यावरून प्रश्न करण्यात आला. मात्र, अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल बोलणे टाळल्याचे बघायला मिळाले. मराठा आरक्षणावर गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा आरक्षण समर्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

सर्वांनाच धक्का देत गुणरत्न सदावर्ते हे थेट बिग बॉस हिंदीमध्ये दाखल झाले. आज विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा गुणरत्न सदावर्ते यांचा क्लास लावू शकतो. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी निर्णय घेत थेट गुणरत्न सदावर्ते यांना घरातील जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला जोरदार विरोध गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला.

गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून आणि अत्यंत स्पष्टपणे सांगितले की, मला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नाही. मला सरकार घाबरते मला दाऊद इब्राहिम घाबरतो. त्यानंतर बिग बॉसने देखील गुणरत्न सदावर्ते यांना सांगितले की, तुम्हाला घरातील जेलमध्ये जावे लागेल. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, मी नॉमिनेशमध्ये जाईल पण जेलमध्ये जाणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;