सूरज चव्हाणला अजित पवारांनी थेट विचारला ‘तो’ मोठा प्रश्न, बिग बॉसच्या विजेत्याने…

सूरज चव्हाणला अजित पवारांनी थेट विचारला ‘तो’ मोठा प्रश्न, बिग बॉसच्या विजेत्याने…

बिग बॉस सीजना ५ चा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी सांगितले की, सूरज हा आमच्या बारामतीमधील मोढवे गावाचा आहे. सुरवातीला रिल्स काढत असताना सुरजला बिग बॉसमध्ये संधी मिळाली. सूरजचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकण हे लोकांना भावलं. सुरजला 2 बीएचके घर बांधून देण्याचा निर्णय घेतलाय. सूरज चव्हाण पुढचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मी रितेश देशमुखशी बोलणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

सूरज चव्हाण याचं कौतूक करताना आणि सत्कार करताना अजित पवार यांंचं लक्ष सूरज चव्हाणने छातीवर काढलेल्या त्या टॅटूवर गेलं. त्यांनी सूरज चव्हाणला विचारलं देखील की हे टॅटू कसलं काढलं आहे. तेव्हा सूरज चव्हाणने उत्तर दिले की, उमाजी नाईक यांचं ते टॅटू आहे.’

उमाजी नाईक कोण आहेत?

उमाजी नाईक हे पहिले भारतीय क्रांतिकारक होते. ज्यांनी 1826 ते 1832 च्या दरम्यान भारतातील ब्रिटीश राजवटीला आव्हान दिले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. मराठा महासंघाचे पतन झाल्यानंतर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध एक लहान सैन्य उभे केले होते.

सूरज चव्हाण यांच्यासाठी आता अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला असून तसे आदेश ही त्यांनी दिले आहेत. यावेळी सूरज सोबत बोलताना अजित दादांनी त्याच्यासोबत गप्पा मारल्या. सूरज चव्हाण देखील त्यांना आपल्या स्टाईलने भरपूर हसवलं. सुरज चव्हाण हा विजयी झाल्यापासून गावागावात त्याची मिरवणूक काढली जात आहे.

बिग बॉसच्या घरात आल्यापासून सूरज चव्हाणची लोकप्रियता भरपूर वाढली. आधीपासूनच त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला. शेवटी आलो आणि शेवटीच जाणार असं सूरज चव्हाण म्हणाला होता आणि तसंच घडलं. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्राफी जिंकली. शेवटच्या टप्प्यात त्याची स्पर्धा गायक अभिजीत सावंत सोबत होती, पण सूरज चव्हाण याला भक्कम पाठिंबा मिळाल्याने तो विजयी झाला.

सूरज चव्हाण याने आपल्या स्टाईलने महाराष्ट्रात एक वेगळी ओळख बनवली होती. तो सुरुवातीला रिल्समुळे सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. सूरज चव्हाण याची परिस्थिती पाहून लोकांना पण वाईट वाटलं होतं. सूरज चव्हाणलाच विजयी करायचं असं अनेकांचं म्हणणं होतं. आई-वडिलांचं छत्र लवकर हरवल्याने सूरजने अनेक संघर्ष केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;