इस्रायलकडून इराणच्या अणु केंद्रांवर सायबर हल्ला, देशातील सर्व महत्वाच्या सेवा विस्कळीत
इराण आणि इस्रायलमध्ये सध्या तणाव सुरू आहे. असे असतानाच इस्रायलने शनिवारी इराणच्या आण्विक स्थळांसह अणु केंद्रांना लक्ष्य करत सायबर हल्ले करण्यात आले. याशिवाय अनेक आस्थापनांवर एकाच वेळी सायबर हल्ले झाल्याने इराण सरकारच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणवर केलेल्या हल्ल्याच्या दिशेने इस्रायलचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी कार्यालये गंभीर सायबर हल्ले आणि माहिती चोरीमुळे प्रभावित झाल्याचे इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी सांगितले.
आमच्या अणु प्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक आणि बंदरे यासारख्या महत्वाच्या नेटवर्कवरही सायबर हल्ला झाला असल्याचे फिरोजाबादी पुढे म्हणाले.
इराणने 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या क्षेपणास्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जाते. क्षेपणास्त्र हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल, तसेच हा बदला घातक आणि आश्चर्यजनक असेल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी दिला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List