अवघ्या 6 महिन्यांच्या लेकीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार, लेक 32 वर्षांची झाल्यावर म्हणतो…

अवघ्या 6 महिन्यांच्या लेकीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार, लेक 32 वर्षांची झाल्यावर म्हणतो…

Marriage Life: सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. त्या अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता रॉनित रॉय आहे. रॉनित आता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात अनेक उतार – चढाव आले होते.

रॉनित रॉय याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष निलम सिंग हिला डेट केल्यानंतर अभिनेत्रीने 2003 मध्ये लग्न केलं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीसोबत लग्नाचा 20 वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. रॉनित आता दुसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याचं पहिलं लग्न झोआना मुमताज नावाच्या एक महिलेसोबत झालं होतं. रॉनित आणि झोआना यांना एक मुलगी देखील आहे.

रॉनित आणि पहिल्या पत्नीमुलगी आता 32 वर्षांची झाली आहे. पण लेक फक्त सहा महिन्यांची असताना अभिनेत्याने पहिल्या पत्नीची साथ सोडली. मुली फक्त सहा महिन्यांची असताना रॉनित आणि झोआना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्याला लेकीसोबत जास्त काळ राहता आलं नाही. याची खंत अभिनेत्याने एका मुलाखतीत बोलून देखील दाखवली.

रॉनित आणि झोआना यांच्या मुलीचं नाव ओना असं आहे. लेकीबद्दल अभिनेता म्हणाला, ‘माझी एक मुलगी आहे. जिच्याप्रति माझ्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. निलम (दुसरी पत्नी) आणि माझी भेट झाली तेव्ही ओना फक्त 14 वर्षांची होती. आम्ही तिघं एकदा बाहेर गेलो होते.’

‘फिरून झाल्यानंतर मी ओनाला घरी सोडलं कार मधून उतरल्यानंतर ओना मला म्हणाली, बाबा मला माहिती तुम्हाला दोघांना लग्न करायचं आहे…ओना आणि माझा सहवास फक्त सहा महिन्यांचा होता… पण मी तिचा बाप आहे, हे तिला माहिती होतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

पुढे रॉनित रॉय म्हणाला, ‘मी माझ्या लेकीचं बालपण मीस केलं आहे. गेल्या दिवसांची आठवण आली तरी मला प्रचंज दुःख होतं. ओना आता मोठी आहे. तर दुसरीकडे आमचं बाप – लेकीचं नातं अधिक घट्ट होत आहे…’ असं देखील रॉनित रॉय म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;