मोदी, शहाच्या मेहरबानीवर चालणाऱ्या निवडणूक आयोगाला शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; संजय राऊत कडाडले

मोदी, शहाच्या मेहरबानीवर चालणाऱ्या निवडणूक आयोगाला शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; संजय राऊत कडाडले

शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा खरा मेळावा आहे, याला अनेक वर्षांची वैचारिक परंपरा आहे. मात्र, सध्या काहीजण डुप्लिकेट शिवसेनेच्या नावाने काहीजण पिपाण्या वाजवत आहेत. आमच्या रणशिंगासमोर या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. शिवसेनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असे त्यांनी ठणकावले.

काही लोकांनी पक्ष आणि चिन्ह चोरले असेल पण मूळ शिवसेनेचा विचार आणि जनता आमच्यासोबत आहे. कोणती शिवसेना खरी किंवा खोटी हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. सध्या निवडणूक आयोग मोदी, शहा यांच्या मेहरबानीवर चालत आहे. काही दिवसांनी हा आयोग निवृत्त होौणार आहे. त्यामुळे शिवसेनेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. जनतेने असली शिवसेना कोण आहे, ते दाखवून दिले आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. आज या मेळाव्यात रणशिंग फुकंले जाणार आहे. या रणशिंगांसमोर फुंकण्यात येणाऱ्या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

हुतात्मा स्मारकातील हुतात्मांच्या हातात मशाल आहे. तीच मशाल आता आमच्या हातात आहे. दिल्लीतील सत्ताधारी आणि व्यापारी मंडळाचे नेते मोदी, शहा महाराष्ट्राची लूट करत आहेत. जे लोकसभेला त्यांच्यासोबत उभे राहिले त्यांनी या सुटीला पाठिंबा दिला, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र आणि मुंबई लुटण्याचे काम सध्याचे रावण करत आहे. यंदा महाराष्ट्रातीलप रावणदहन अखेरचे असेल, य़ानंतर राज्यात रावण निर्मणच होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;