‘मला तुमच्याकडून मुल हवंय…’, 78 वर्षीय अभिनेत्याकडे महिलेची अजब मागणी

‘मला तुमच्याकडून मुल हवंय…’, 78 वर्षीय अभिनेत्याकडे महिलेची अजब मागणी

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. असंच काही अभिनेते कबीर बेदी यांच्यासोबत झालं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कबीर यांनी मोठा खुलासा केला आहे. वयाच्या 78 व्या कबीर बेदी यांच्या चाहतीने ‘मला तुमच्याकडून मुल हवंय…’ अशी मागणी केली. तेव्हा घडलेली घटना कबीर बेदी यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कबीर बेदी यांची चर्चा रंगलेली आहे.

घडलेल्या घटनेबद्दल कबीर बेदी म्हणाले, ‘एका कार्यक्रमासाठी मी स्पेन याठिकाणी गेलो होतो. कार्यक्रमात मला चाहत्यांच्या पुस्तकावर सही करायची होती. मी त्याठिकाणी जात होतो. पण माझ्या मॅनेजरने सांगितलं, तुमचं कार्यक्रमासाठी जाणं योग्य नाही कारण चाहत्यांची मोठी गर्दी जमली. कोणतही घटना घडू शकते.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

 

‘मी कार्यक्रमाच्या ठिकाणी कसा-बसा पोहोचले. चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली होती. तेव्हा एक महिला चाहती मला म्हणाली, ‘मला तुमच्यापासून मुल हवं आहे…’ मी घाबरलो. बाहेर निघण्यासाठी मला रस्ता देखील नव्हता. अखेर गाड्यांवरुन उड्या मारत रस्ता पार केला आणि एक गाडी थांबवली, गाडीत बसलो आणि तेथून निघालो. निघालो नसतो तर माझ्या चाहत्यांना काय केलं असतं माहिती नाही. माझ्यासोबत काय झालं असतं.’ असं देखील कबीर बेदी म्हणाले.

कबीर बेदी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा कबीर बेदी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे कबीर बेदी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात.

कबीर बेदी फक्त त्यांच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिले. कबीर बेदी यांनी एक दोन नाही तर, चार वेळा लग्न केलं. तीन लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर यांनी चौथं लग्न केलं. कबीर यांनी चौथं लग्न परवीन दुसांज यांच्यासोबत केलं. वयाच्या ७० व्या वर्षी कबीर बेदी यांनी लग्न केलं. कबीर बेदी यंची चौथी पत्नी त्यांच्या लेकी पेक्षा 5 वर्षांनी लहान असं सांगितलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;