सातारकरांचा दसरा मेळावा दिमाखात, मनोज धुमाळ यांना ‘कामगार रत्न’ पुरस्कार

सातारकरांचा दसरा मेळावा दिमाखात, मनोज धुमाळ यांना ‘कामगार रत्न’ पुरस्कार

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहून तिथल्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सातारावासीयांचा भव्य दसरा मेळावा दादर येथील शिवाजी मंदिर येथे दसऱयाच्या पूर्वसंध्येला आयोजित केला होता. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या सोहळ्यात भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांचा ‘कामगार रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सातारावासीयांचा भव्य दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाच्या कार्यक्रमावर उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाचे सावट होते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख अतिथी महंत स.भ. मोहनबुवा रामदासी, मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी (महाराज) वडगांव जयराम स्वामी, कायदेतज्ञ अॅड. उदय वारुंजीकर यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने, राजाराम शिंदे, महेश पवार, दीपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवरदेखील उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या सातारा भवनसाठी एका भूखंडाची निवड केली असून लवकरच तो ताब्यात घेऊन त्याची निर्मिती केली जाईल, अशी सुखद घोषणा या वेळी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम (नाना) निकम यांनी केली. महंत मोहनबुवा रामदासी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सातारा जिह्याचे महत्त्व विशद केले तर सत्कारमूर्तींच्या वतीने प्राची कोल्हटकर-जांभेकर, सुरेश गोडसे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

सातारा रत्न, सातारा भूषण पुरस्काराने दिग्गजांचा गौरव  

या मेळाव्यात  सातारा रत्न पुरस्कार देऊन रामराजे नाईक-निंबाळकर, राहुल भंडारे, मनोज धुमाळ, विनया माने, अरुण गोडबोले, अंजली गोडसे, विकास धनवडे, शिवाजीराव माने, नीलेश बुधावले, डॉ. अरुण माने, अॅड. पांडुरंग पोळ, सोमनाथ घार्गे, विनायक गाढवे यांना गौरवण्यात आले. तर सातारा भूषण पुरस्कार किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, भार्गव जगताप यांच्यासह वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;