जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा, ओमर अब्दुल्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राजभवन येथे जाऊन राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अपक्षांकडून मिळालेली पाठिंब्याची पत्रेही त्यांना सादर केल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी भेटीनंतर पत्रकारांना दिली. शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित करण्याची या वेळी विनंती करण्यात आल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List