Border Gavaskar Trophy 2024-25 – रोहित शिवाय टीम इंडियाला खेळावं लागणार? आता BCCI काय करणार?

Border Gavaskar Trophy 2024-25 – रोहित शिवाय टीम इंडियाला खेळावं लागणार? आता BCCI काय करणार?

टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. परंतु टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीचे दोन सामने खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहित शर्माने बीसीसीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे बीसीसीआय समोर आता मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा व्यक्तिगत कारणांमुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यात आहे. रोहित शर्माने तशी माहिती बीसीसीआयला दिली आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. परंतु शक्य झाल्यास रोहित सर्व पाच कसोटी सामने खेळू शकतो. टीम इंडिया 22 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच दुसरा सामना 6 ते 10 डिसेंबर अ‍ॅडलेड (दिवस-रात्र), चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर मेलबर्नमध्ये आणि पाचवा सामना 3 ते 7 जानेवारी सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;