गुणरत्न सदावर्ते याचा दाऊद इब्राहिमबद्दल ‘तो’ हैराण करणारा खुलासा, मोठी खळबळ, थेट म्हणाला, सरकार…

गुणरत्न सदावर्ते याचा दाऊद इब्राहिमबद्दल ‘तो’ हैराण करणारा खुलासा, मोठी खळबळ, थेट म्हणाला, सरकार…

‘बिग बॉस मराठी सीजन 5’नंतर आता बिग बॉस 18 ला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे अनेक दिग्गज कलाकार हे बिग बॉस सीजन 18 मध्ये धमाल करताना दिसत आहेत. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील यंदा बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गुणरत्न सदावर्ते यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बिग बॉस 18 ला सलमान खान हा त्याच्या तब्येतीमुळे होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, सलमान खान हाच बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. सलमान खानचा बिग बॉसच्या घरातील अंदाज लोकांना प्रचंड आवडतो.

बिग बॉस सीजन 18 ला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झालेले असताना घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे घरात जोरदार हंगामे करत आहेत. हेच नाही तर त्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांचा निर्णय देखील मान्य केला नसल्याचे बघायला मिळतंय. थेट सलमान खानसोबतही पंगा घेतला. दाऊद इब्राहिमबद्दलही थेट मोठे भाष्य बिग बॉसच्या घरात करताना गुणरत्न सदावर्ते हे दिसले आहेत.

बिग बॉसने म्हटले की, जेलमध्ये असलेले सदस्यांना बाहेर देऊ द्यायचे असेल तर तुम्ही ठरवा की, त्यांना बाहेर काढून जेलची शिक्षा कोणाला द्यायची. मग बिग बॉसने करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांना एक विशेषाधिकार दिला. तिघांना मिळून घरातील एका स्पर्धकाचे नाव ठरवाचे ज्याला पुढील जेलची शिक्षा द्यायची. तिघांनी मिळून गुणरत्नचे नाव घेतले.

मात्र, यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा चांगलाच संताप हा बघायला मिळाला. गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले की, मी जेलमध्ये जाणार नाही. मी या आठवड्यात नॉमिनेशमध्ये जाईल पण जेलमध्ये नाहीच. गुणरत्न सदावर्ते तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट बिग बॉसच्या निर्मात्यांनाच धमकी देऊन टाकली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नाही. सरकार मला घाबरते.

दाऊद इब्राहिम मला घाबरतो….काहीही झाले तरीही मी जेलमध्ये जाणार नाही. यानंतर बिग बॉसने सांगितले की, गुणरत्न सदावर्ते तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. मला जेलमध्ये कोणीच टाकू शकत नाही आणि मी जेलमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बिग बॉसनेही माघार घेतल्याचे बघायला मिळाले. आता विकेंडच्या वारला सलमान खान गुणरत्न सदावर्तेला काय बोलतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;