मैत्रीसाठी जीव घेणारा रानटी मित्र; संतोष जुवेकरचा खतरनाक अंदाज

मैत्रीसाठी जीव घेणारा रानटी मित्र; संतोष जुवेकरचा खतरनाक अंदाज

चित्रपटातील भूमिकांसाठी कलाकार काय-काय करत असतात. एखादं दृश्य खरं वाटावं यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. काही कलाकार चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला कचरत नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क टक्कल करून घेतलंय. पायाने अपंग असणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा अ‍ॅक्शनपट येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअपमध्ये धावण्यापासून ते अगदी ॲक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषने साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्वीकारत संतोषने घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो की, “कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते. दिग्दर्शक समित कक्कड यांच्याकडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह द्विगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.”

‘रानटी’ चित्रपटाला हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;