अमिताभ बच्चन – रेखा यांचे ‘प्रेमसंबंध’? बिग बी म्हणाले, ‘मी रेखा यांच्यासोबत…’

अमिताभ बच्चन – रेखा यांचे ‘प्रेमसंबंध’? बिग बी म्हणाले, ‘मी रेखा यांच्यासोबत…’

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा झगमगत्या विश्वातील असं नाव आहे… ज्यांच्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण एक वेळ अशी देखील आली जेव्हा दोघांनी एकत्र काम करणं देखील बंद केलं. रेखा यांनी अनेक मुलाखतींमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर असलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं नाही.

दरम्यान, 1998 साली झालेल्या एका मुलाखतीत सिमी ग्रेवाल यांनी अमिताभ बच्चन यांना रेखा यांच्याबद्दल प्रश्न विचारले आणि बिग बी यांनी देखील सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. दोघांच्या शेवटची भेट कधी झाली होती? असा प्रश्न बिग बी यांना विचारण्यात आला होता.

यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘अनेक वर्ष झाली आहे… माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, कधी कोणत्या कार्यक्रमात आमची भेट होते. पुरस्कार सोहळ्यात आमची भेट होते.’ पुढे बिग बींना विचारण्यात आलं, ‘रंगणाऱ्या अफवा त्रस्त करणाऱ्या आहेत का?’

बिग बी म्हणाले, ‘नाही… मी अनेक आरोपांचा सामना केला आहे. पण खरं सांगायचं झालं तर, काही आरोपांना काही अर्थ नव्हता. काहींनी दावा केला होता, मी रेखा यांच्यासोबत त्यांच्या घरात राहात आहे. त्यानंतर त्या माझ्या घरी राहायला आल्या. काही दावे असे देखील करण्यात आले की, त्यांच्याकडे घराचे फोटो आहेत, तेथे मी रेखा यांना ठेवलं आहे.’

‘ते माझं घर आहे. मी माझ्या कुटुंबासोबत राहात आहे. माझे आजारी आई-वडील घरात राहात आहेत. मी त्यांची सेवा करतोय. जी लोकं महिलांबद्दल असा विचार करतात मला त्यांना मला खरंच विचारायचं आहे की, त्यांनी काही अनैतिक पाहिलं आहे का?’ असं देखील बिग बी म्हणाले होते.

रिपोर्टनुसार, जेव्हा रेखा यांच्यासोबत बिग बी यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन यांचं जया बच्चन यांच्यासोबत लग्न झालं होते. आज अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नातं संपून अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;