सूरज चव्हाण याने केला अत्यंत मोठा ‘तो’ खुलासा, थेट म्हणाला, घराला…

सूरज चव्हाण याने केला अत्यंत मोठा ‘तो’ खुलासा, थेट म्हणाला, घराला…

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये धमाल करत होते. टीआरपीमध्येही जबरदस्त अशी कामगिरी या सीजनने केली. बिग बॉस मराठीमध्ये वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार सहभागी झाले. मोठे वाद, आरोप प्रत्यारोप हे बघायला मिळाली. रितेश देशमुख हा पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना दिसला. रितेश देशमुखचा खास आणि नवा अंदाज प्रेक्षकांना जबरदस्त आवडला. आता काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीचा फिनाले झाला असून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरलाय.

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निकी तांबोळी हे टॉप 3 मध्ये पोहोचले होते. सूरज आणि अभिजीत हे टॉपमध्ये पोहोचले आणि सूरज हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला. सूरज चव्हाण याच्यावर काैतुकांचा वर्षाव केला जातोय. लोक सतत सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सूरज चांगलाच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.

सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर अभिजीत सावंत याच्यासोबत सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला होता. त्यानंतर सूरजने थेट आपले गाव गाठले. यावेळी गावकऱ्यांनी सूरज चव्हाण याचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे थेट डिजे लावून सूरजचे स्वागत गावात करण्यात आले. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

आता सूरज चव्हाण याच्याकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असतानाच त्याच्याकडून सांगण्यात आले की, त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाहीये. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपण घर बांधणार आहोत. आता त्याबद्दलच अत्यंत मोठे अपडेट हे सूरज चव्हाण याच्याकडून देण्यात आले.

सूरज हा बारामतीमधील मोढवे या गावचा रहिवासी आहे. सूरजने म्हटले की, मी आता माझे घर गावात बांधणार आहे आणि मी माझ्या घराला नाव बिग बॉस देणार आहे. फक्त घरच नाही तर घराला काय नाव देणार हे देखील सूरजने सांगून टाकले आहे. स्वत:चे एक चांगले घर असावे हे आपले स्वप्न असल्याचे सांगताना सूरज चव्हाण हा दिसला होता. आता खरोखjच लवकरच सूरजचे घर होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;