मजा नही आया… ऐश्वर्याबद्दल बिग बी हे काय बोलून गेले ? आजही या विधानाची का होतेय चर्चा?

मजा नही आया… ऐश्वर्याबद्दल बिग बी हे काय बोलून गेले ?  आजही या विधानाची का होतेय चर्चा?

अमिताभ बच्चन ये हे त्यांच्या अभिनयाप्रमाणेच नम्रपणसाठी बरेच प्रसिद्ध आहेत, ते नेहमी मोठ्यांचा आदर करतात. त्यांचं कुटुंब हे सदैव त्यांच्यासाठी अग्रस्थानी असतात. अशीच शिकवण त्यांनी आपल्या मुलांनाही दिली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबाबाबत विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी रहात असल्याचीही चर्चा आहे. अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर वेगाने फिरत आहेत.

मात्र याच ऐश्वर्या रायबद्दल अनेक वर्षांपूर्वी बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांनी असं विधान केलं होतं, ज्याची आजही चर्चा होत असते. अनेक वर्ष उलटून गेली पण बिग बी यांच्या तोंडून निघालेले ते शब्द लोकं विसरू शकलेले नाहीत. खरं तर, ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाचा भाग नव्हती. अमिताभ आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अभिषेकसोबत लग्नाआधीही ऐश्वर्याला अमिताभ यांच्याबद्दल खूप आदर होता.

20 वर्षांपूर्वी काय घडलं ?

त्या दोघांनी एकत्र अनेक पिक्चर्समध्ये काम केलं आहे. त्यातील एक चित्रपट होता ‘क्यों हो गया ना’. रोमँटिक ड्रामा असलेला हा चित्रपट 2004 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यामध्ये ऐश्वर्या, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी बिग बींनी ऐश्वर्यावर अशी काही कमेंट केली होती, जे आजही कोणीच विसरू शकलेलं नाही, त्याची आजही चर्चा होत असते.

ऐश्वर्याचे काका होते अमिताभ

या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका फार मोठी नव्हती, पण ती खूप महत्त्वाची होती. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अनाथाश्रमाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आणि ऐश्वर्या त्यांना अंकल म्हणायची.
हीच चित्रपटाच्या स्क्रिप्टची मागणी होती. त्याच वेळी, ऍशच्या तोंडून स्वतःसाठी ‘अंकल’ ऐकून अमिताभ हे थोडे चिडले होते. ऐश्वर्या सारख्या सुंदर महिलेकडून काका अशी हाक ऐकणं बिग बी यांना फारसं रुचलं नाही.

मजा नाही आली , बिग बी यांचं विधान चर्चेत

ऐश्वर्यासोबत काम करून कसं वाटलं , असा सवाल याच चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान अमिताभ यांना विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ गमतीने म्हणाले की, ‘ ॲशसोबत काम करताना मला आनंद होत नाही. तिच्यासोबत काम करताना मजा नाही आली’. पण तेवढ्यात ते पुढे म्हणाले की, ‘ ऐश्वर्या इतकी सुंदर आहे, की तिच्या काकांची भूमिका साकारून मला बिलकूल आनंद नाही झाला’. त्यानंतर बिग बी यांनी तिच्या कामाचं खूप कौतुकही केलं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;