इचलकरंजी सरकारी रुग्णालयातील दूषित पाणी प्रक्रियेविना पंचगंगेत! प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

इचलकरंजी सरकारी रुग्णालयातील दूषित पाणी प्रक्रियेविना पंचगंगेत! प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

शहरातील दोनशे बेडच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया व शवविच्छेदन तसेच अन्य सांडपाण्यावर कसलीच प्रक्रिया न करता ते भुयारी गटारी मार्गाने पंचगंगा नदीत सोडण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार बुधवारी प्रदूषण नियंत्रण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तपासणी करून सूचना दिल्या.

सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी याबाबत ई-मेलद्वारे लेखी तक्रार केली होती. यांची गंभीर दखल घेत विभागीय क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयात इटीपी व एसटीपी प्लांट अस्तित्वातच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे सुधारणेची संधी देत तोंडी सूचना देण्यात आल्याचे समजते.

संतोष हत्तीकर यांनी हॉस्पिटल अधीक्षक यांच्यावरच कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. सोबत बँक गॅरंटी जप्त करा, अशीही मागणी करताना पंचगंगा नदीच्या पाण्यात विनापरवाना व बेकायदा अशुद्ध, प्रदूषित पाणी मिसळल्याने त्वचा विकार, पोटदुखी, उलटी, जुलाब आदींचा त्रास लोकांना होत असल्याचा आरोप केला. आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणेचे प्रदूषित पाणी नदीत मिसळते, याकडे हॉस्पिटल दुर्लक्ष कसे करते, असा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी तपासणी करून रुग्णालय प्रशासनास सूचना केल्याची चर्चा सुरू होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;