Ratan Tata क्रिकेटपटूंना दिल्या नोकर्‍या अन् पाठिंबा, रतन टाटांचे खेळातही बहुमोल योगदान

Ratan Tata क्रिकेटपटूंना दिल्या नोकर्‍या अन् पाठिंबा, रतन टाटांचे खेळातही बहुमोल योगदान

हिंदुस्थानातील उद्योग महर्षी रतन टाटा यांनी बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली. राजकीय, मनोरंजन, क्रीडाविश्वासह सर्व क्षेत्रातून रतन टाटा यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे. रतन टाटा यांचे हिंदुस्थानी क्रिकेटच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. अनेक दिग्गज खेळाडू रतन टाटा यांच्या संघासाठी क्रिकेट खेळले आहेत.

रतन टाटा यांच्या काळात टाटा समूहाच्या विविध कंपन्यांनी अनेक हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला. आर्थिक मदतीसाठी खेळाडूंना नोकर्‍या दिल्या. टाटा समूहाच्या एअर इंडियाने १९९३ च्या जगज्जेत्या हिंदुस्थानी संघातील मोहिंदर अमरनाथला खूप पाठिंबा दिला. मेहंदरला एअर इंडियाकडून पगार मिळत असे. याशिवाय फारुख इंजिनियर टाटा मोटर्ससाठी क्रिकेट खेळायचे.

टाटा समूहाने संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, जवागल श्रीनाथ, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ या दिग्गज खेळाडूंनाही पाठिंबा दिला. हे सर्व खेळाडू टाटा इकोसिस्टमचा भाग होते. टाटा स्टीलने टीम इंडियाचे विद्यमान मुख्य निवडकर्ता अजित आगरकरलाही खूप मदत केली. २००७ मध्ये टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. या संघात अजित आगरकर देखील होता. सध्या खेळत असलेला शार्दुल ठाकूर (टाटा पॉवर) व जयंत यादव (एअर इंडिया) यांनीही टाटा समूहाने खूप पाठिंबा दिला आहे.

खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

क्रीडाविश्वातून सचिन तेंडुलकर रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, युसुफ पठाण, ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा यांनी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;