Ratan Tata यांचा लाडका ‘Goa’ जेव्हा त्यांना अखेरचं भेटायला आला, का पडलं त्याला हे नाव? वाचा सविस्तर…

Ratan Tata यांचा लाडका ‘Goa’ जेव्हा त्यांना अखेरचं भेटायला आला, का पडलं त्याला हे नाव? वाचा सविस्तर…

रतन टाटा आणि त्यांचे श्वान प्रेम साऱ्या हिंदुस्थानाला प्रचलित आहे. त्यांनी कुत्र्यांना कुटुंबाचा एक भाग मानले होते. त्याची प्रचिती आज अंत्यदर्शनावेळी सर्वांनाच आली. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरळी येथील NCPA ग्राऊंडमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांचा लाडका श्वान ‘गोवा’ रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाला होता. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.

हिंदुस्थानाचेच नव्हे तर जगभरातील नामांकित आणि दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वासह हिंदुस्थानावर शोककळा पसरली आहे. वरळी येथील शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा लाडका श्वान ‘गोवा’ NCPA ग्राऊंडमध्ये आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षांपूर्वी टाटा कंपनीचे कर्मचारी कामानिमित्त गोव्याला गेले होते. तेव्हा रस्त्यावर त्यांना एका कुत्र्याचे पिल्लू मिळाले. रतन टाटा त्याला घेऊन मुंबईत आले. तेव्हापासून गोवा रतन टाटा यांच्या निवासस्थानी राहत आहे. हा गोवा त्यांना गोव्याला मिळाला म्हणून त्याचे नाव ‘गोवा’ असे ठेवण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

रतन टाटा यांचे श्वानांवर विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर त्यांनी नवी मुंबईमध्ये कुत्र्यांसाठी 165 कोटी रुपये खर्च करून 5 मजली रुग्णालय सुद्धा सुरू केले आहे. कुत्र्यांना मी माझ्या कुटुंबाचा एक महत्वपूर्ण भाग मानतो, असे त्यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी सांगितले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;