Jalna News – जालन्यात तृतीयपंथीयाचा गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला

Jalna News – जालन्यात तृतीयपंथीयाचा गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप शिवारातील सोमनाथ सहाने यांच्या शेतातील विहिरीत पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याला आज 10 ऑक्टोंबर रोजी सांयकाळच्या सुमारास एक मृतदेह तरंगताना आढळून आला. हा मृतदेह 35 ते 40 वर्षीय महिलेचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संबंधित शेतकर्‍याने तातडीने गावातील पोलीस पाटील आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी विहिरीजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो मृतदेह विहिरीतुन चारपायी बाजेच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. मृतदेह स्त्रीचे कपडे परिधान केलेले असल्यामुळे महिलेचा असल्याचा अंदाज होता, मात्र, यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात सदर व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे निदर्शनास आले आहे. या मृतदेहाचा गळा कापण्यात आलेला असून, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना अंदाजे दोन-तीन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, सदर तृतीयपंथी व्यक्तीचा गळा चिरून खून करून मृतदेह विहिरीत टाकला असण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे हे करीत असून, या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन किरण बिडवे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;