रतन टाटा यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन तूफान ट्रोल, ‘ती’ एक चूक आणि…

रतन टाटा यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन तूफान ट्रोल, ‘ती’ एक चूक आणि…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आताही त्यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे आज मोठ्या संपत्तीची मालक आहेत. काैन बनेंगा करडोपतीला अमिताभ बच्चन हे होस्ट करत आहेत. शोमध्ये ते बऱ्याचवेळा आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतात.

उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. रतन टाटा यांच्या निधनावर बॉलिवूडपासून साऊथपर्यंत अनेक स्टार्सनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर करत श्रध्दाजंली वाहिली. काही फोटो स्वत:चे अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत शेअर केले. अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्या निधनानंतर स्टोरी शेअर केली आणि सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:चे फोटो शेअर केल्याने आता ते लोकांच्या निशाण्यावर आले.

लोकांना अमिताभ बच्चन यांचे हेच वागणे अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत अमिताभ बच्चन यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना यामुळेच जोरदार टार्गेट केले जातंय. चाहत्यांना देखील अमिताभ बच्चन यांचे हे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून व्लॉगच्या माध्यमातूनही आपल्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे, हे सांगताना बऱ्याचवेळा दिसतात. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला की, त्यांचे शूटिंग कशाप्रकारे सुरू असते आणि ती किती शिफ्टमध्ये काम करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;