कर्नाटकात भाजपकडून कोविड घोटाळा, काँग्रेसकडून SIT स्थापन

कर्नाटकात भाजपकडून कोविड घोटाळा, काँग्रेसकडून SIT स्थापन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या काळात कोविडमध्ये सात हजार 223 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. ता काँग्रेस सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या घोटाळ्यावर एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड काळात अनेक वैद्यकीय उपकरणं घेण्यात आली त्यात मास्क, औषधं, ऑक्सिजन सिलिंडर आणि पीपीई किट घेताना सरकारकडून कुठलीच परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या काळात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्यांतही फेरफार केल्याचा आरोप आहे.

या एसआयटीसोबत आणखी एक उपसमिती नेमण्यात आली आहे. त्यात या उपकरणांच्या किंमतीबद्दल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही उपकरणं विकत घेण्याचे आदेश दिले त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यात ज्या कंपन्या दोषी आढळल्या जातील त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल असे सरकारने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;