शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची हकालपट्टी करा, भाजप कार्यकर्त्यांचे बावनकुळेंकडे निवेदन

शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची हकालपट्टी करा, भाजप कार्यकर्त्यांचे बावनकुळेंकडे निवेदन

माजी आमदार आणि भाजप नेते शिवाजीराव पाटील कव्‍हेकर यांना भाजपमधून तात्‍काळ निलंबीत करावे अशी मागणी रेणापूर तालुक्‍यातील भाजपच्‍या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार रमेश कराड आणि माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यामध्ये शितयुध्द सुरू आहे.

रेणापूर तालुक्यात गावागावात, तालुक्यात पक्षाच्या नेत्यांचे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरा निश्चित होण्यापूर्वी संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्व सूचना दिली जाते. प्रदेश अथवा जिल्हा भाजपच्या वतीने कुठलाही पक्षाचा कार्यक्रम दिला नसताना रेणापूर तालुक्यात भाजप किसान मोर्चाचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रेणापूर तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ते आणि त्यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अजितसिंह पाटील कव्हेकर हे रेणापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी परिवर्तन संकल्प यात्रा या नावाने दौरा करत आहेत.

शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी वेळोवेळी सुपारी घेऊन भाजपला विस्कळीत करण्याचे काम केल्याचा आरोप करत. त्यांनी कधीच कुठल्याही विकास कामासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्‍यात यावे अशी मागणी रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या वतीने प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;