चंद्रचूड यांच्याकडे वकिलांनी केल्या न्यायमूर्तींच्या तक्रारी, पत्र लिहून केल्या महत्वाच्या मागण्या

चंद्रचूड यांच्याकडे वकिलांनी केल्या न्यायमूर्तींच्या तक्रारी, पत्र लिहून केल्या महत्वाच्या मागण्या

देशातल्या अनेक बार असोसिएशनचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना एक पत्र लिहीले आहे. त्या पत्राच्या माध्यमातून सुनावणी दरम्यान वकिलांशी योग्य पद्धतीने बोलावे, न्यायमूर्तींनीही शिष्टाचाराची काळजी घ्यावी आणि कोणत्याही वकिलाचा अपमान होता कामा नये अशा मागण्या केल्या आहेत. याबाबत मद्रास उच्च न्यायलय, तामिळनाडू बार असोसिएशन आणि पडुचेरी बार असोसिएशनने सीजेआय चंद्रचूड यांना एक पत्र लिहीले आहे.

पत्रात लिहीले आहे की, वकिलांसोबत बोलताना सन्मानपूर्ण भाषेचा वापर केला पाहिजे. जे न्यायमूर्ती स्वत:ला वकिलापेक्षा मोठे समजतात, त्यांच्यावर ओरडतात त्यांच्यावर लगाम आणला पाहिजे. एका निवेदनात म्हणाले आहेत की, वकिल आणि न्यायमूर्ती यांना न्याय प्रशासनात एकसमान अधिकार आहे. मात्र तरी काही न्यायमूर्तींना असा समज झाला आहे की, वकील त्यांच्या हाताखाली येतात. त्यामुळे ते सुनावणी दरम्यान वकिलांवर ओरडतात, त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलतात. अनेक प्रसंगी त्यांना कमी लेखलेही जाते. अनेक प्रसंगात त्यांच्या शिष्टाचार ध्यानात घेतले जात नाही.

आता मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद 1 ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सुरु झाला. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती एल व्हिक्टोरिया गौरी यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्याप्रकरणी एक वेळ अशी आली न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांच्याकडून वरिष्ठ वकिल पी. विल्सन यांना फटकारले. एवढेच नाही त्यांना वकिलांनी युक्ती करुन त्यांना अनेक प्रकरणातून दूर करण्याचा प्रयत्न केला. वकिल सातत्याने माफी मागत होते मात्र न्यायमूर्तींनी त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. त्यांचा विषय समजण्यासही त्यांनी नकार दिला. आज सीजेआय चंद्रचूड या विवादावर काय निर्णय घेतात, त्यांचे काय म्हणणे आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच काही प्रकरणात चंद्रचूड यांना संतापताना पाहिले आहे, अनेकदा सुनावणी दरम्यान त्यांनी वकिलांना फटकारले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;