‘लय आवडतेस तू मला’मध्ये पहायला मिळणार महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट- रांगडी प्रेमकथा

‘लय आवडतेस तू मला’मध्ये पहायला मिळणार महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट- रांगडी प्रेमकथा

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘लय आवडतेस तू मला’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यात ही मालिका यशस्वी ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एका सरळ रेषेत चालणाऱ्या आयुष्याचं, समाजाचं, हाडा-मासाच्या लोकांचं, त्यांच्या प्रेमाचं सत्य मांडणारी ही मालिका आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेची पहिली झलक समोर आली होती. प्रेक्षकांना आता या मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही मालिका येत्या 14 ऑक्टोबरपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सानिका आणि सरकार या दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पात्रांभोवती फिरणारी ‘#लय आवडतेस तू मला!’ या मालिकेचं कथानक फिरतं. दोन प्रेम करणाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं प्रेम मान्य नाही अशा अनेक प्रेमकथा आजवर आपण पाहिल्या आहेत. पण साखरगावची अल्लड सानिका आणि कळशी गावचा रांगडा सरकार यांच्या प्रेमकथेला तर त्या दोघांच्या गावांचाच विरोध आहे. कारण या गावांमध्ये पिढीजात वैर आहे. जे एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, अशा वातावरणात सानिका आणि सरकारचं अल्लड प्रेम बहरणार का, हे मालिकेत पहायला मिळेल. शत्रुत्वाच्या आगीत फुलणाऱ्या ही आगळीवेगळी प्रेमकथा उलगडणारी गोष्ट म्हणजे ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका.

छोट्या पडद्यावरील प्रेम कथेची चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत करण्यात आला आहे. आता छोट्या पडद्यावर प्रेम आणि शत्रुत्वाचा रंजक खेळ रंगणार आहे. गावाकडच्या गुलाबी प्रेमाची थरारक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण वर्गासह सर्वांनाच आकर्षित करणारी ही मालिका आहे. थरार, नाट्य, रोमान्स अन् बरंच काही प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेतील सानिका खूपच निरागस, भावूक, जिद्दी आणि प्रेमळ आहे. तर सरकार तिच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तो गावचा छावा आहे. अत्यंत रावडी असं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. एका वेगळ्याच संघर्षातून फुलणारं प्रेम प्रेक्षकांना या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेबद्दल बोलताना कलर्स मराठीचे, (वायकॉम18) प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले, “कलर्स मराठी वाहिनीवर सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिकादेखील याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आजवर अनेक प्रेम कथा पाहिल्या असतील. पण ही झन्नाट लव्हस्टोरी मात्र यासगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. फ्रेश जोडी, रांगडी कथा, गावरान बाज अशा मालिकेतील अनेक गोष्टींची प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पडेल”.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;