हिंदुस्थानच्या उद्योग विश्वातलं रत्न हरपलं, रतन टाटा यांचे निधन

हिंदुस्थानच्या उद्योग विश्वातलं रत्न हरपलं, रतन टाटा यांचे निधन

156 वर्षांचा वैभवशाली वारसा असलेल्या टाटा समूहाला यशोशिखरावर नेणारे, टाटा आणि विश्वास ही नाळ घट्ट करणारे, हिंदुस्थानच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांचे आज रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच पँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश हळहळला असून हिंदुस्थानचं उद्योग विश्वातलं रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री 11.56 वाजता टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक्स पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली.

दरम्यान, टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याबाबत सोमवारीही बातम्या आल्या होत्या. त्याचे खुद्द टाटा यांनीच ‘एक्स’ माध्यमातून खंडन केले होते. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे टाटांनी नमूद केले होते.

n रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होत. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुखपदाची धुरा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;